असाच एक किस्सा काल घडला. राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते अजित पवार यांनी आपले सगळे कार्यक्रम रद्द केले, अगदी फोनही बंद केला. अजित पवार नॉटरीचेबल झाल्याचं लक्षात येताच मराठी माध्यमांनी बातमी चालवली, "अजित पवार नॉटरीचेबल, राज्यात कोणती राजकीय घटना घडणार ?" असे या बातम्यांचे स्वरुप होते. माध्यमांनी शरद पवार यांनाही गाठले. अर्थातच त्यांनी नेहमीच्या शैलीतच बरेच काही सांगितले पण पाहिजे ते बोललेच नाहीत.
आज सकाळी अजित पवार यांनीच खुलासा केला, "मला पित्ताचा त्रास झाला म्हणून मी कार्यक्रम रद्द केले." अजित पवार यांचा आजवरचा इतिहास पाहता त्यांचे पित्त उसळण्याचे कारण नैसर्गिक की राजकीय असा संभ्रम निर्माण होऊ शकतो.
कारण काहीही असेल, पण माझ्या मनात एक "वेगळा विचार" येऊन गेला,
" पित्त अजित पवारांना... पण उलट्या मराठी माध्यमांना....!!!"
आनंद कुलकर्णी
ज्येष्ठ पत्रकार,
No comments:
Post a Comment