तुम्ही काडतूस मग बंदूक कोण ?

महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर सध्या खूपच घसरला आहे. राजकारण तत्वावरुन व्यक्तीवर घसरलं आहे. राजकीय मतभेद राजकीय वैरात बदलत आहे. त्यातून एकमेकांवर पातळी सोडून टीका केली जात आहे. नेते आणि त्यांचे समर्थक बगलबच्चे सोडले तर बाकी सामान्य जनता आता या सगळ्या प्रकारांना कंटाळली आहे.

यातलाच एक किस्सा परवा घडला. ठाणे येथे बोलताना उध्दव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख "फडतूस गृहमंत्री" असा केला. ठाकरे भक्तांना यामुळे मनस्वी आनंद झाला तर फडणवीस भक्त "आता साहेब याला कसं धुतात ते पहा" असं म्हणत मनात मांडे खाऊ लागले. देवेंद्र फडणवीस ही चांगलेच संतापले. याला उत्तर दिलं नाही तर ते फडणवीस कसले ? त्यांनी मग "मी फडतूस नाही, काडतूस आहे" असं यमक जुळवलं. फडणवीस भक्त बेहद्द खूष झाले. "साहेब, काडतूस आहेत, आत घुसून मारतात..!!" भक्तांनी फडणवीस स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. 

माझ्या मनात मात्र एक "वेगळा विचार" चमकून गेला. काडतूस स्वत: काही करु शकत नाही. ते घुसायचे असेल तर बंदूकीत घालून कुणीतरी उडवावं लागतं. फडणवीस काडतूस असतील तर बंदूक आणि ती चालवणारं कोण ? शहा की मोदी ....??

आनंद कुलकर्णी
ज्येष्ठ पत्रकार, जयसिंगपूर - ४१६१०१

No comments:

Post a Comment

पुतण्याची पॉवर काका पेक्षा भलतीच जादा की....!!

खा. शरद पवार यांच्या राजीनामा नाट्याचा शेवट आज अपेक्षेनुसारच झाला. त्यांनी आ. अजित पवार यांना एकट पाडून यातून धडा शिकवला अशा स्वरुपाची चर्चा...