..... यांना आध्यात्मावर बोलण्याचा अधिकार आहे का ?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांचे वक्तृत्व आणि बोलण्याची शैली अत्यंत प्रभावी आहे याबाबत शंकाच नाही. त्यांचे मुद्देही सडेतोड आणि परखड असतात. यामुळे त्यांच्या चाहत्यांचा वर्ग मोठा आहे. 

आपल्याकडे राजकारणात अंध मोदी भक्त आहेत तसेच प्रत्येक पक्षात कमी अधिक प्रमाणात नेत्यांचे अंध भक्त आहेतच. पक्ष रसातळाला गेला तरी गांधी आडनावातच पक्षाचे भवितव्य शोधणारे काँग्रेसवाले, राज्यात कधीच तीन अंकी आमदार निवडून आणता आले नसले तरी पवार साहेबांना देशाचे जाणते नेते म्हणणारे राष्ट्रवादी काँग्रेसवाले, पक्ष संपला तरी शिवसेना म्हणजे ठाकरेच म्हणणारे उध्दव ठाकरे प्रेमी अशी अनेक उदाहरणे या अंध भक्तीची देता येतील. हे सगळे अंधभक्त आपल्या राजकीय नेत्याची व्यक्ती म्हणून विवेकी चिकित्सा करण्यापेक्षा त्याला राजकारणातील दैवत बनवून त्यांचे अनेकदा कंबर कसून समर्थनच करत असतात.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही याला अपवाद नाही. मनसेच्या कार्यकर्यांचे राज ठाकरे हे दैवत आहेत. त्यांचा शब्द म्हणजे ब्रह्म वाक्य मानले जाते. शिवसेना सोडून राज ठाकरे यांनी मनसेना स्थापन केली तेव्हा त्यांनी यामागचे कारण सांगताना, "माझा विठ्ठलाशी वाद नाही, बडव्यांशी आहे" अशा अर्थाचे एक विधान केले होते. परवाच्या गुढी पाडवा सभेत शिवतीर्थावर त्यांनी हे वाक्य पुन्हा एकदा उच्चारले. त्यांच्या भक्तांसाठी हे राज ठाकरे यांनी केलेले अतिशय समर्पक व चपखल समर्थन असेलही.... 

पण हे ऐकल्यावर माझ्या मनात मात्र एक 'वेगळा विचार' आला,

"बडव्यांना कंटाळून विठ्ठलालाच सोडणाऱ्यांना आध्यात्मावर बोलण्याचा अधिकार आहे का ?"

आनंद वामन कुलकर्णी
ज्येष्ठ पत्रकार, जयसिंगपूर - ४१६१०१

No comments:

Post a Comment

पुतण्याची पॉवर काका पेक्षा भलतीच जादा की....!!

खा. शरद पवार यांच्या राजीनामा नाट्याचा शेवट आज अपेक्षेनुसारच झाला. त्यांनी आ. अजित पवार यांना एकट पाडून यातून धडा शिकवला अशा स्वरुपाची चर्चा...